वार्ताहर (राहुल खेवलकर) डहाणू :- लाखों भाविकांचे श्रध्द्धा स्थान असलेली डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या चैत्र नवरात्र यात्रेला येत्या २ एप्रिल पासून सुरुवात होते आहे. महाराष्ट्र संहित गुजरात राज्यातील देखील लाखों भाविकांची श्रद्धास्थान असलेली महालक्ष्मीची यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील उत्साहात साजरी करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. त्यासंदर्भात मंदिर ट्रस्ट कर्मचारी वर्ग स्थानिक ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गाची नुकतीच संयुक्तिक बैठक पार पडली. त्यात सर्व प्रकारच्या उपाययोजना आणि सुरक्षा संदर्भी सूचना देण्यात आल्या. दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील लाखों रुपयांची उलाढाल या यात्रेत होण्याची शक्यता आहे.
डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेची सुरुवात २ एप्रिलपासून
डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेची सुरुवात २ एप्रिलपासून
Leave a Comment
Leave a Comment














